![]() |
प्रतीकात्मक फोटो |
तुळजापुर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये आज दि,२६ मार्च भव्य असे बैलगाडा शर्यत व कारवान श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता तुळजापूर शहरातील लक्ष्मी नगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर , कळंब धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, युवा नेते विनोद गंगणे यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, शिवबा राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments