धाराशिव शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव : शिवा अखिल वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रा धोंडे सर यांच्या आदेशाने धाराशिव शहर येथे क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी शिवा संघटना शहर प्रमुख श्री महेश रामचंद्र उपासे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, नगरपरिषद तसेच लोकनेते आमदार कैलास पाटील तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष शहर दीपराज भोकरे, संघटनेचे संघटक अभिजीत साठे, शंभूदेव भोकरे, सुनील बाळासाहेब कुंभार, श्रीकांत भोकरे, राहुल नागप्पा मुर्गे, बाळू भोकरे, बालाजी जटाळे, सचिन स्वामी, शुभम बाळासाहेब कुंभार, नागेश शिवलिंग होनखांबे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खलील सर (काँग्रेस पक्ष),गणेश रानबा वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते), संघपाल शिंगाडे, कमलाकर बनसोडे, बिलाल तांबोळी, शितल चव्हाण (वंचित बहुजन आघाडी जिल्हा), भाई फुलचंद गायकवाड , प्रदीप बनसोडे (वाय बी एस जिल्हाध्यक्ष),प्रशांत शिंदे, राजेंद्र धावारे, राम कदम, प्रज्ञावंत ओव्हाळ , आदिसह उपस्थित होत.
0 Comments