शेतीची मशागत करताना ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण ठार ,तुळजापूर तालुक्यातील घटना!
तुळजापुर: तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी नागेश शिवाजी अक्कलकोटे वय (32) हा तरुण सावरगाव शिवारात स्वतःच्या शेतीत मशागत करताना ट्रॅक्टर पलटी होऊन ठार झाला, ही दुर्घटना शुक्रवारी दि २६ रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी नागेश शिवाजी अक्कलकोटे हे शुक्रवारी दि,26 रोजी स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत काम करत होते काम सुरू असताना अचानक ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन तो उलटला. यावेळी त्यांना सावरण्याची कसलीच संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी नागेश अक्कलकोटे हे ट्रॅक्टर खाली चिरडले गेले. या घटनेत त्यांचा जागेत मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती कळताच शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी शेताकडे जाऊन मृतदेह बाजूला काढला, नागेश अक्कलकोटे यांच्या पार्थिवावर रात्री दहा वाजण्याच्या सावरगाव येथील लिंगायत स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येक कार्यात हिरारीने सहभाग नोंदवणाऱ्या होतकरू तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई -वडील ,पत्नी,तीन मुली,भाऊ,भावजय,असा परिवार आहे.
0 Comments