ग्रामीण भागात पाण्याचा व्यवसाय तेजीत
लग्नसमारंभासह अन्य कार्यक्रमांमध्ये वाढतय जारची मागणी !
धाराशिव: पूर्वी काही वर्षांपूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो यावर विश्वास ठेवायला कोणी तयार होत नव्हते परंतु काही टंचाई व शुद्ध पाण्याची मागणी यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बाटली बंद व जार बंद पाण्याचा व्यवसाय सर्वत्र फोफावला आहे. यात ग्रामीण भागाही अपवाद राहिला नाही, ग्रामीण भागातही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
केवळ श्रीमंताच्या हातात दिसणारा पाण्याचा जार आता खेड्यापाड्यातही दिसू लागला आहे, शहरातील विविध समारंभामध्ये दिसणारे थंड पाण्याचे जार आता ग्रामीण भागातील समारंभामध्ये हे दिसू लागली आहेत. लहान सोहळ्यातच नव्हे तर लहान मोठ्या कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमातही शुद्ध व थंड जारच्या पाण्याला मागणी वाढली आहे.
उन्हाळ्यात चालणारा व्यवसाय हा बारमही झाला आहे, जारच्या पाण्याचा वापर ही बाब आता गरजेची झाली आहे. प्रत्येकजण समारंभात शुद्ध पाण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. सर्वसाधारण लोकांचा पाण्याचा जारचा विकत घेण्याकडे कल वाढला आहे. प्रत्येक जार मध्ये साधारण वीस लिटर पाणी असते. प्रत्येक जार मागे वीस ते पंचवीस रुपये आकारले जातात.
कमी पैशात शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने पाणी विकत घेण्याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचाही कल वाढला आहे, परिणामी व्यावसायिकांची चांदी झाली आहे. स्पेशल गाड्यांमधून पाण्याची डिलिव्हरी शहरा बरोबर ग्रामीण भागातही केली जात असल्याचे चित्र आहे. फोन करून आपली डिमांड त्यांना कळवली की लगेच गाडी येऊन मागणीची पूर्तता केली जाते, ग्रामपंग्रामपंचायतींना विशेष निधीची तरतूद करून गावोगावी वॉटर एटीएम ची उभारणी केली असली, तरी हा व्यवसाय तेजीत दिसत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, ग्रामीण भागात यात्रा उत्सव सुरू आहेत, उन्हाचा पाराही वाढला आहे. परिणामी शुद्ध व थंड पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतर व्यवसाय थंड असली तरी शुद्ध व थंड पाण्याचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे.
0 Comments