Hot Posts

6/recent/ticker-posts

व्यसनमुक्त युवक संघाचा पेमगिरी येथे युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळा |Addict-free Youth Sangh's Pratapi Sanskar ceremony for youth at Pemgiri

 व्यसनमुक्त युवक संघाचा पेमगिरी  येथे युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळा !


नातेपुते प्रतिनिधी : स्वराज्य संकल्प भूमी शहागड पेमगिरी ता. संगमनेर जि. अहमदनगर आधुनिकतेच्या युगात व्यसनांमुळे भरकटत चाललेल्या युवकांना सत्पथगामी बनवून त्यांना  राष्ट्रभक्तीसाठी प्रेरित करण्यासाठी  व्यसनमुक्त युवक हाच खरा समाजसुधारक हाच ध्यास घेऊन व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ही संघटना गेली २३ वर्षे युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळे आयोजित करते. सन  २०२३ चा युवकांसाठीचा प्रतापी संस्कार सोहळा स्वराज्य संकल्पक , सरलष्कर,फर्जंद महाराज साहेब शहाजी राजे यांनी ज्या किल्ल्यावर स्वतंत्र राज्य स्थापन केले होते अशा शहागड  पेमगिरी या ठिकाणी आयोजित केला होता.

           या सोहळ्यात प्रार्थना , सूर्यनमस्कार , योगासने, प्राणायाम, सुलभ नित्योपासना या ग्रंथाचे पारायण , विविध विषयांवर चर्चासत्रे, व्याख्यान , हरिपाठ, कीर्तन याचबरोबर विविध गुणदर्शन, कुस्तीच्या स्पर्धा, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना यासारखे उपक्रम आयोजित केले होते. तसेच व्यसनमुक्त युवक संघाची व्यसनमुक्ती प्रबोधिका या पुस्तकाची चौथी आवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक सहभागी झाले होते. 

             या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुवर्य बंडातात्या कराडकर  पक्षाघाताच्या आजारामुळे शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतानाही उत्साहाने सहभागी होऊन युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. हरिपाठाच्या वेळी पाऊली खेळणे, कीर्तनात चाली म्हणणे, विशेष म्हणजे एकनाथी भारुड सादर करणे आधी कार्यक्रम संपन्न 

      यावेळी संघटनेतर्फे दिला जाणारा छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ.  तात्याराव लहाने यांना देण्यात आला. त्याचबरोबर

राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित पुरस्कार समाधान सलगर माढा, शिक्षकरत्न पुरस्कार विजयकुमार फलफले इंदापूर,उद्योगरत्न पुरस्कार दीपक जठार , नातेपुते व्यवसाय रत्न पुरस्कार विशाल सुतार  पुसेसावळी, 

क्रीडारत्न पुरस्कार पै. माऊली कोरे माण, कृषीरत्न पुरस्कार विकास देशमुख कराड,

 या सोहळ्यासाठी पेमगिरी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी  सहकार्य केले या सोहळ्यासाठी अगस्ती ऋषी ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प दीपक महाराज देशमुख व त्यांचे सहकारी आरोटे माऊली यांनी विशेष परिश्रम घेतले  तसेच संपूर्ण मंडप व स्पीकर व्यवस्था वायुनंदन डेकोरेटर्स - सुभाष औटी यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली अशी माहिती व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र चे कार्यकर्ते प्रा. बापुराव माने यांनी  दिली.

Post a Comment

0 Comments