काटगाव शिवारातील शेतातील चोरट्याकडून विद्युत मोटार लंपास , चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारातून एका शेतकऱ्याची विद्युत मोटर लंपास झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नळदृग पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे चोरीच्या वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे चोरट्यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्यात याव्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेले अधिक माहिती अशी की, :फिर्यादी नामे-रविकिरण सुरदास माळी, वय 32 वर्षे, रा. काटगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचे काटगाव शिवारातील शेत गट नं 88/3 मधुन लाढा लक्ष्मी कंपनीची 5 एच पी ची पाणबुडी मोटर, ओसवाल कंपनीची 5 एचपीची पाणबुडी मोटर, सौरउर्जेवर चालणारी व विजेची पाणबुडी मोटर असा एकुण 25,000₹ किंमतीच्या मोटारी या दि. 30.07.2025 रोजी 22.00 ते दि.31.07.2025 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रविकिरण माळी यांनी दि.01.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments