उमरगा शहरातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी २४ तासाचे आत गजाआड ; उमरगा पोलिसांची कामगिरी . चारित्र्याच्या संशयातून प्रियकराकडून खून,
धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : चारित्र्याच्या संशयावरून उमरगा शहरातील एका महिलेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पुणे येथून आरोपीस 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाणे मध्ये संबंधित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दि.13.07.2025 रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास पोलीस ठाणे उमरगा येथे माहिती मिळाली की, पतंगे रोड उमरगा येथील मोमीन मस्जिद जवळ राहणारी महिला नामे सौ माया रमेश शिंदे, वय 45 वर्षे, ही राहते घरी बेडवर मृतावस्थेत पडलेली असुन तिच्या गळ्यावर कशानेतरी गळा आवळल्याचे व्रण दिसत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ जावून पंचनामा करुन मयतेचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे घेवून जावून वैद्यकीय अधिकारी यांचे कडून प्रेताचे पी.एम. करण्यात आले. त्यानंतर चौकशी मध्ये मोमीन मस्जिद जवळील तांत्रिक विशलेषणावरुन आरोपीस घटनास्थळी जाताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे विचारपुस करुन तापस केला असता सदर महिला माया रमेश शिंदे, वय 45 वर्षे, हिस तिचाच प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे, वय 44 वर्षे, रा. हिप्परगाराव ता. उमरगा ह.मु. तुरोरी ता. उमरगा याने अनैतिक संबंधातुन तिच्या चारीत्र्यावर संशय घेवून गमजाने गळा आवळुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात फिर्यादी नामे- रोहिणी दिपक पाटोळे, वय 24 वर्षे, रा.साईनगर सोसायटी मांजरी, पुणे जि. पुणे यांनी दि.14.7.2025 रोजी पो.स्टे हजर येवुन फिर्यादी जबाब दिलृयावरुन पोलीस ठाणे उमरगा गुरनं462/2025 कलम 103(1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल असुन गुन्ह्याचा तपास अश्विनी भोसले पोलीस निरीक्षक पो.स्टे. उमरगा हे करीत आहे.
तपासा गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा तांत्रिक विशलेषणाद्वारे शोध घेवून त्यास पुणे येथुन ताब्यात घेवून दि.14.07.2025 रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस दि.15.7.2025 रोजी मा. न्यायालय उमरगा यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयांनी नमुद आरोपीस दि.18.07.2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केला आहे. तपासात आरोपी मयत महिलेचे चारीत्र्यावर संशय घेवुन तिच्यामुळेच त्याचे कौटुंबिक जीवन बरबाद झाल्याचा राग मनात धरुन दि.12.07.2025 रोजी रात्री तिच्या घरी जावून गमजाने तिचा गळ आवळुन खुन केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हा घडल्यापासुन 24 तासाचे आत आरोपी निष्पन्न करुन त्याचा शोधघेवून त्यास जेरबंद करुन उमरगा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री. सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोलीस हावलदार चैतन्य कोनगुलवार, अतुल जाधव, वाल्मिक कोळी, शिवलिंग घोळसगांव, पोलीस नाईक अनुरुद्र कवळे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments