Hot Posts

6/recent/ticker-posts

अखेर आनंद पाटील यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर.

अखेर आनंद पाटील यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव : पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण व अपहरण प्रकरणी शिवसेनेचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांना उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवार 26 जून रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

06 जून रोजी उमरगा तालुक्यातील कोराळ येथे पवनचक्कीचे काम बंद करून अपहरण ,मारहाण व धमकी प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांच्यासह इतर 16 जणां विरोधात 7 जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments