/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे इटकळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी.

Hot Posts

मौजे इटकळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी.

मौजे इटकळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी.


--------------------------------------

साखरेला ५० रुपये एमएसपी, इथेनॉलला ७० रुपये दरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या; मंडळ अधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन.

---------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे) : शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, धाराशिव यांच्या वतीने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग NH-65 वरील ईटकळ, ता. तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बेमुदत रस्ता रोको आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी पाटील साहेब यांनी स्वीकारले असून, हे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.साखरेला ५० रुपये, इथेनॉलला ७० रुपये दराची मागणी शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने संघटनेच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये साखरेला प्रतिकिलो ५० रुपये किमान विक्री दर (MSP), इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.या मागण्यांसाठी आयोजित आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शेतकरी प्रश्नांबाबत एकजूट दाखवून दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी पाटील साहेब यांनी स्वीकारून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

विविध पदाधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे, लखन भोसले, तालुकाध्यक्ष मकबूल मुल्ला, विनायक जाधव, विकास पाटील, संजय शिवकर, संगमेश्वर जळकोटे सर, नितीन कांबळे, बळीराम जाधव, राजेंद्र सुरवसे, कृष्णा नवाडे, अर्जुन विठ्ठलकर, मोसिन शेख, बबन काळे, मधुकर जाधव, छगन पाटील, जंगू पटेल, नसीर पटेल, विनोद काळे यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आर्थिक हितासाठी आयोजित या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना, धाराशिव यांच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>