तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे राजमाता जिजाऊ स्मृती दिन व वर्धापन दिन साजरा.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर:तुळजापुर तालुक्यातील लोहगाव येथील मातोश्री जिजामाता विद्यालय व कै.प्रभाकर भस्मे उच्च माध्यमिक विद्यालय येथे मा जिजाऊ स्मृती दिन व वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब बिराजदार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सी बी बिराजदार सर तर प्रमुख पाहुणे दृष्टी उद्योग समूह अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश नगरसेवक कार्यकारणी सदस्य अशोक भाऊ जगदाळे व संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मारेकर सर माजी उपनगराध्यक्ष नितीन कासार माजी संजय मोरे, अमृत पुदाले, एस.पी जाधव सर, विनायक माने सर, व विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार पी ए होते.
यावेळी प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांनी 8वी,9वी व 11 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मारेकर सर यांनी केले सूत्रसंचालन कलशेट्टी सर तर आभार क्षीरसागर सर केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .वंदे मातरम राष्ट्रगाणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments