तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार|
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
तुळजापूर :- तालुक्यातील लोहगाव येथे सोमवार दि,१९ रोजी मातोश्री जिजामाता विद्यालय व कै प्र.भ. उच्च माध्यमिक विद्यालय लोहगाव येथे विद्यालयातील व परिसरातील नंदगाव, सलगर व काझी कणमस येथील १०वी व १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षकआमदार विक्रम काळे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बलसुर चे उपाध्यक्ष गोविंदराज साळुंखे तर प्रमुख पाहुणे संभाजीनगर शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक उप निरीक्षक श्री धनराज सराफ ,संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मारेकर सर,जळकोटचे विस्तार अधिकारी पवार सर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ.अंकुश कदम , लोहारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे संस्थेचे कोषाध्यक्ष सौ. अलकाताई मारेकर ,सचिव श्री ज्ञानेश्वर बेंडकाळे मुख्याध्यापक श्रीमती पवार मॅडम तसेच नंदगाव , सलगर कनमस गावातील सरपंच ,उपसरपंच व परिसरातील विद्यालयातील मुख्याध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते. राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला . विद्यालयास २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनदर्शिकेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला . दिनदर्शिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव मारेकर सर यांनी केले सूत्रसंचालन क्षीरसागर सर तर आभार श्री कलशेट्टी सर यांनी मांडले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments