ईपीएस 95 निवृत्ती वेतन धारकांचे हक्कांचे निवृत्ती वेतन मिळणवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. मा.खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव :दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या विविध मागण्यासाठी दि, २० रोजी चालू असलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनास पाठिंबा देणे करिता खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भेट दिली. विविध महामंडळातील कर्मचारी यांना योग्य निवृत्ती वेतन मिळावे याकरिता दिल्ली स्थित जंतर मंतर येथील मैदानावर ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या संघटनेकडून आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शन धारक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. स्वतःच्या हक्काच्या निवृत्ती वेतनाकरीता लढा देण्यासाठी अंदोलन सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईपीएस 95 पेन्शन धारकांचे पेन्शन जवळपास सात ते नऊ हजार रुपये करणे बाबत केंद्र शासनास आदेशित केले होते सदर निर्णय होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येऊन देखील झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला अद्याप ईपीएस 95 निवृत्तीवेतन धारकांचे प्रश्न सोडवण्यास वेळ मिळालेला नाही. सरकारला जागे करण्याकरिता नॅशनल एगिटेशन कमिटी मार्फत ईपीएस 95 पेन्शन धारकाचे संघटन करून हक्काचे पेन्शन मिळविण्याकरिता संघर्ष सुरू आहे.
जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर निवृत्ती वेतना संदर्भात तारांकित प्रश्न लोकसभेत विचारला होता. अद्यापही या प्रश्नावर कोणताही मार्ग मिळालेला नाही म्हणून जिल्हाभरातील ईपीएस 95 पेन्शन धारक तसेच त्यांची संघटना न्याय मागणीसाठी जंतर -मंतर येथे उपोषण व आंदोलन करीत आहे. खासदार ओमप्रकाश राजानिंबाळकर साहेब हे लोकसभेच्या अकराव्या सत्र च्या पावसाळी अधिवेशना करिता दिल्ली येथे गेलेले आहेत. त्यांनी सदर न्याय मागणीस दर्शविला असून एपीएस 95 निवृत्ती वेतनधारकांची भेट घेऊन त्यांच्या न्याय मागणीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ईपीएस 95 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कमांडर अशोक राऊत, धाराशिव जिल्हयाचे ईपीएस 95 संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत थोरात, कार्यकारणीचे सदस्य तसेच अनेक निवृत्ती वेतनधारक उपस्थित होते.
0 Comments