बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा - मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता
उस्मानाबाद,दि,20 :- उस्मानाबाद जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक कृती आराखड्याची सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. बाल विवाह निर्मुलन जिल्हा कृती दलाची बैठक,मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या प्रसंगी श्री.गुप्ता बोलत होते. या बैठकीस, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) गोडभरले एस.एच, जिल्हा आरोग्य अधिकारी के.के.मिटकरी, जिल्हा परिविक्षा अधिकारी व्यकंट देवकर,बाल कल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने,सदस्य मैना भोसले, दिपाली जहागीरदार, ,एसबीसी -3 व युनिसेफ समन्वयक कुसुम गुप्ता , सदाम शेख उपस्थित होते.
एकात्मीक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत जिल्हयातील अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्येक गावातील ग्राम बाल संरक्षण समितीची माहिती एकत्रीत करुन समिती समोर सादर करण्याच्या सुचना कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण, जि.प. यांना देण्यात आल्या.एकातमीक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत गावपातळीवरील अंगणवाडीमार्फत प्रत्येक गावस्तरावर बाल विवाह प्रतिबंध विषयक जनजागृतीपर मेळावे, सभा, बैठका आयोजित करावेत व अशा कार्यक्रमाचे फोटोसह व व्हीडीओसह अहवाल कृतीदलास सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले
सलग 10 ते 12 दिवस मुलींची शाळेत अनुउपस्थिती झाल्यास त्याची नोंद घेण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागास आदेशित केले, तसेच किशोरवयीन मुलींचे गट करुन या गटांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात, अल्पवयीन गरोदर मातांची माहिती जिल्हा बाल विवाह प्रतिबंध कृतीदलास देण्यात यावी, शाळामधुन आरोग्य व बाल विवाह विषयक समुपदेशन विद्यार्थ्याना देण्यात यावे., ग्राम स्तरावरील सर्व ग्राम बाल संरक्षण समित्यांची स्थापना करुन त्यांना स्रकीय करणे, किशोर वयीन मुलींचे शाळा महाविद्यालय स्तरावर मेळावे घ्यावे,प्रचारप्रसिध्दीसाठी एसबीसी3 यांच्याकडील पोस्टर्स (IEC) वापरण्यात यावीत व ती सर्व विभागांना पुरविण्यात यावीत, जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याचे नागरीकांनी हेल्पलाईन क्रमांक 1098, जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहनही श्री.गुप्ता यांनी केले. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. बालविवाहाच्या दुष्परिणामाबद्दल मुलींबरोबरच मुलांमध्ये देखील जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभाग आदिंची भूमिका महत्वाची आहे. असेही श्री.गुप्ता यावेळी म्हणाले.
0 Comments