Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगवी मार्डी गावचे सुपुत्र सुखदेव भास्कर गायकवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार

सांगवी मार्डी गावचे सुपुत्र सुखदेव भास्कर गायकवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार 

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


तुळजापूर : तालुक्यातील सांगवी मार्डी येथील सुखदेव भास्कर गायकवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्वोत्तम मार्काने पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सांगवी मार्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, तसेच सुखदेव भास्कर गायकवाड,यांची घोड्यावरून ढोल ताशांच्या गजरात  संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,त्यानंतर सुखदेव भास्कर गायकवाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला,यावेळी मान्यवरांनी अपले मनोगत व्यक्त केले,यावेळी गावचे सरपंच युवराज बागल,उपसरपंच सतीश बागल,ग्रामसेवक लाटकर, माजी सरपंच गोविंद जाधव,तानाजी बागल,किशोर जाधव,पोलीस पाटील संजय पाटील,यांच्यासह ग्रामपंच्यायतचे सर्व सदस्य,सांगवी मार्डी ग्रामस्थ व गायकवाड कुटुंबीय,तसेच  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद,यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments