महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात बी आर एस पक्षांमध्ये सामील व्हावे : ॲड रुपेश माडजे पाटील
धाराशिव: हीच ती संधी हाच तो क्षण बी आर एस ला महाराष्ट्रामध्ये सुवर्णकाळ महाराष्ट्रातील जनतेच्या अमूल्य मताची महाराष्ट्रातील राजकारण्याकडून उडवली खिल्ली त्यामुळे आता जनतेने नोटाचा पर्याय निवडण्या पेक्षा भारत राष्ट्र समितीला सक्षम पर्याय म्हणून निवडून द्यावे. काँग्रेस आणि भाजपाने आज पर्यंत देशावर सर्वाधिक काळ राज्य केलेले .आहे भाजप आणि काँग्रेस मध्ये काय फरक आहे? हे दोघे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या सर्वांची राजवट आपण पाहिलेली आहे यांच्यात नवीन काय आहे आता ही सर्व जनतेने थांबवावी लागेल आपणास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची,दिन दलितांची,मजुरांची दयनीय परिस्थिती बदलायची असेल तर बी आर एस पार्टीचे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही.देशाचे नेते झोपेचे सोंग घेत असतील तर जनतेने जागृत झाले पाहिजे राज्यकर्त्यांच्या विकृत राजकीय खेळीच्या परिणामापोटी जनतेला त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.त्यामुळेच बी आर एस पार्टी एक उत्तम पर्याय म्हणून समोर आली आहे महाराष्ट्रातील शेतकरी दलित,आदिवासी,ओबीसी ,शोषित वंचित पीडित,अल्पसंख्यांक,विद्यार्थी युवक,महिला सर्वजण मिळून बी आर एस पार्टीचा गुलाबी झेंडा महाराष्ट्राच्या आकाशात फडकुया.
त्या अनुषंगाने KCR साहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दौरे करून पक्ष बळकट करावेत.
अशा अराजकीय परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात बी आर एस पक्षांमध्ये सामील व्हावे अशे आवाहन अॅड. रुपेश माडजे पाटील यांनी केली आहे.
अॅड.रुपेश माडजे पाटील
जिल्हा समन्वयक उस्मानाबाद
भारत राष्ट्र समिती
(BRS)
0 Comments