Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते,नगरपरिषद तुळजापूर परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत विविध विकास कामाचा सोमवारी भूमिपूजन सोहळा.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते,नगरपरिषद तुळजापूर परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत  विविध विकास कामाचे सोमवारी भूमिपूजन 


धाराशिव: 
तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न, लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते तसेच तुळजापूर शहराचे युवा नेते विनोद (पिंटू भैय्या) गंगणे व मा. नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शासनामार्फत नगरपरिषद तुळजापूर करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा योजने अंतर्गत एकूण १२ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला असून सदरच्या निधीमधून नगरपरिषद हद्द वाढीतील शिंदे प्लॉटिंग, शांताई नगर तसेच नगरपरिषद येथील वडर गल्ली, प्रभाग क्रमांक २ हडको येथील या भागातील अंतर्गत रस्त्याची व नालीची कामे करण्यात येणार असून सदर ठिकाणी पेवर ब्लॉक, काँक्रिटीकरण रस्ते, काँक्रीट नाली, अपसिंगा रोड येथे नव्याने स्मशानभुमी इत्यादी कामे प्रस्तावित असून सदरच्या कामाचे कार्यारंभ आदेश नगर परिषदेमार्फत देण्यात आला आहे त्यानुसार सदरच्या कामास शुभारंभ करण्यात येणार आहे.


सर्व नागरिकांनी शिंदे फ्लॉटींग तुळजापूर खुर्द येथे दि. १४/०८/२०२३ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता उपस्थित राहावे असे आव्हान युवा नेते विनोद (पिंटू भैय्या) गंगणे तसेच मा. नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : शिंदे फ्लॉटींग तुळजापूर खुर्द

कार्यक्रमाचे दिनांक : १४/०८/२०२३

कार्यक्रमाची वेळ : सायंकाळी ठीक ५ वाजता





Post a Comment

0 Comments