धाराशिव नामकरणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीेने फटाके फोडून जल्लोष
मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनाप्रममुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती
धाराशिव- महाराष्ट्र सरकारने उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेऊन अधिकृत राजपत्र जारी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (दि.16) धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आपला जीव, धाराशिव.. अशा घोषणा देत धाराशिव नामकरणाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी नामकरणाबाबत विचार व्यक्त केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याची अनेक वर्षापासून प्रयत्न होते. त्यासाठी शिवसैनिकांनी काठ्या झेलून अनेकदा आंदोलने केली. तसेच पोलीस केसेस अंगावर घेतल्या. त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना विश्वासात घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या दोन्ही शहरांचे नामकरण झाले आहे. त्यामुळे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज स्वप्नपूर्ती झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवि वाघमारे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, सुरेश गवळी, नितीन शेरखाने, सुनील वाघ, अभिराज कदम, अजित बाकले, शिवप्रताप कोळी, संकेत सूर्यवंशी, अजिंक्य राजेनिंबाळकर, पिंटू आंबेकर, गणेश साळुंके, संदीप शिंदे, प्रभाकर राजेनिंबाळकर, सुमित बागल, सागर कोळपे, जगदीश शिंदे, गुड्डू शेख, सह्याद्री राजेनिंबाळकर, बबलू राऊत, पांडुरंग माने, धनंजय इंगळे, दीपक पाटील, वैभव वीर, संजय भोरे, दिलीप सूर्यवंशी, पृथ्वीराज देडे, प्रशांत जगताप, रुपेश शेटे, नंदू माने, बाळासाहेब मुंडे, ओंकार बांगर, दिनेश बंडगर, नाना घाटगे, दीपक नागरसोगे, अजय जाधव, यशवंत शहापालक, चेतन वाटवडे, अमोल डुरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments