Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची लुटमार चालूच; शासन ऑनलाईन बुकींग ॲपवर कारवाई कधी करणार ? 'सुराज्य अभियाना'चा शासनाला प्रश्न.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची लुटमार चालूच; शासन ऑनलाईन बुकींग ॲपवर कारवाई कधी करणार ? 'सुराज्य अभियाना'चा शासनाला प्रश्न.

सोलापूर - गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त आपल्या गावी जाण्यासाठी निघत आहेत. याची संधी साधत 'रेड बस', 'मेक माय ट्रीप आणि अन्य खाजगी प्रवासी बुकींग अॅप यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त तथा प्रवाशांची लुटमार चालू होत आहे. एस्.टी. बसेसच्या तुलनेत दीडपट अधिक प्रवासी भाडे आकारण्याचा शासन आदेश असतांना खाजगी प्रवासी बसचालक प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट आणि कधी चौप्पट दर आकारणी केली जात आहे. एकीकडे परिवहन विभागाने गणेशोत्सवात प्रवाशांची लुटमार होऊ नये, म्हणून तक्रारीसाठी 8850783643 हा व्हॉट्सअँप क्रमांक जारी केला आहे; मात्र आजच्या ऑनलाईन युगात 80 ते 90 टक्के वाहनांचे आरक्षण हे खाजगी प्रवासी तिकिट बुकींग अॅपद्वारे ऑनलाईन होते; त्याकडे मात्र राज्य परिवहन विभागाचे लक्षच नाही, असे दिसून येते. तरी गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लुटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या 'सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांना देण्यात आले आहे. या वेळी 'सुराज्य अभियाना'चे सोलापूर समन्वयक श्री. दत्तात्रय पिसे आणि श्री. गोपी व्हनमारे उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन विभागाने वर्ष 2018 मध्ये दीडपट भाडेवाढ करणारा शासन आदेश काढला; मात्र त्याची अनेक वर्षे अंमलबजावणी होत नव्हती. याविषयी आंदोलन शासनाने काही प्रमाणात लक्ष दिले असले, तरी ऑनलाईन लुटमारीवर कोणताही अंकुश नाही हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल. वातानुकूलित आसन (ए.सी. सीटर) बससाठी मुंबई - सोलापूरचे 937 ऐवजी 3,000 रुपये आकारले जात आहे.

वातुनूकुलित शयनयानसाठी (ए.सी. स्लीपरसाठी) मुंबई - सोलापूरचे 1,100 ऐवजी 3,000 रुपये, सोलापूर-पुणेचे 770 ऐवजी 2,000 रुपये घेतले जात आहेत. काही ट्रॅव्हल्सवाले सोलापूर-पुणेसाठी ए.सी. स्लीपरचे 10,000 रुपये, तर ए. सी. सीटरसाठी 7,000 रुपये दर आकारात आहेत. तर मुंबई - सावंतवाडी 1,738 ऐवजी 3,425 रुपये आकारले जात आहेत. तर मुंबई- कोल्हापूरसाठी 1,214 ऐवजी 4,850 आकारले जात आहेत. मुंबई - सांगलीसाठी 570 ऐवजी 2,250 रुपये आकारले जात आहे.. पुणे - रत्नागिरीसाठी 971 ऐवजी 1,900 रुपये घेतले जात आहेत. पुणे-सिंधुदुर्गसाठी 1,200 ऐवजी 2,500 रुपये आकारले जात आहेत. तर निमआराम बसचे दापोली- मुंबईसाठी 483 ऐवजी 7,800 रुपये आकारले जात आहेत. सर्व ठिकाणीही अशीच स्थिती आहे. हे सर्व पाहता खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर वा अॅपवर वेगवेगळे प्रवासी दर न ठेवता शासन निर्णयानुसार एस्.टी.च्या दीडपट दर ठेवण्याचे आदेश काढण्यात यावेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच या खासगी कंपन्यांचे परवाने रहित करावेत,अशी  मागणी केली आहे.


प्रतिनिधी रुपेश डोलारे सोलापूर

Post a Comment

0 Comments