बैलपोळादिवशी बैलाच्या पाठीवर लिहून केले शेतकऱ्यांनी मराठा आरक्षणाची मागणी
तुळजापुर : बळीराजाचा अत्यंत महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच बैलपोळा हा सण तुळजापूर तालुक्यातील चिवरी गुरुवारी दि, १४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. खरीप हंगामात पिके उमलताच बळीराजावर आसमानी व सुलतानी संकट ओढवले आहे . बळीराजाची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. अशा परिस्थितीत देखील बळीराजा आपल्या सर्जा राजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे दिसून आले . याचबरोबर येथील शेतकऱ्यांनी राज्यभर चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा म्हणून येथील शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा अशा घोषणा लिहुन सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे.
0 Comments