Hot Posts

6/recent/ticker-posts

अनाथ मतिमंद पीडितेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा|20 years hard labor for a teacher who abused an orphan mentally retarded victim

अनाथ मतिमंद पीडितेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 


सोलापूर /प्रतिनिधी: अनाथ मतिमंद पीडितेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार वय(३६) राहणार जुळे सोलापूर असे त्या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेची हकीकत अशी की महिला संरक्षण व सक्षमीकरण संस्था सोलापूर व अध्यक्ष अपंग अत्याचार संरक्षण समिती सोलापूर यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे अनाथ मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत तक्रारी अर्ज दिला होता.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन माने यांनी मतिमंद मुलीचे वस्तीग्रहाचे अधिक्षिका व दक्षता समितीच्या महिला सदस्य यांच्या समक्ष त्या अनुषंगाने चौकशी केली असता पिढीतेने शाळेतील शिक्षक म्हणजे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे कथन केले. त्यानुसार अधीक्षिका यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासी अंतिम अमलदारांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केली होती. सरकारी वकील एडवोकेट शितल डोके यांनी यातील आरोपी हा अनाथ मते मध्ये शाळा शिक्षक असूनही त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केलेला आहे असा युक्तिवाद केला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.

या गुन्ह्याबाबत ज्याने फिर्याद दिली त्यांनी त्याची माहिती पूर्वीच असतानाही दिली नसल्यामुळे सदर फिर्यादी त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, शिक्षक,  नर्स ,काळजी वाहणारे व संस्थेचे सचिव यांनाही तपासी अंमलदाराने सदर प्रकरणात आरोपी केली होते. सदर प्रकरणात आरोपीने बचावासाठी अधीक्षिका व मानसशास्त्रज्ञ असे दोन साक्षीदार तपासले परंतु सरकार वकील एडवोकेट शितल डोके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीस वीस वर्षे सक्त मजूर शिक्षा सुनावली. याच सरकार पक्षातर्फे एडवोकेट शितल डोके व आरोपीतर्फे एडवोकेट नागराज शिंदे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून प्रवीण जाधव यांनी काम पाहिले

Post a Comment

0 Comments