तुळजापुर येथे जनसेवक मा.अमोल कुतवळ यांच्या हस्ते पापनास येथील गणरायाची आरती
तुळजापूर -( प्रतिनिधी) येथील पापनाश नगर गणेश मंडळाची आरती रविवार दिनांक 24 रोजी तुळजापूर येथील जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांच्या हस्ते संपन्न झाली.
गेल्या तीन वर्षापासून अमोल कुतवळ मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहेत या त्यांच्या कार्याचा मंडळांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
दरवर्षी प्रमाणे मंडळाच्या वतीने भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.अतिशय शांततेत दरवर्षी गणेशोत्सव हा मंडळ साजरा करतो.याबद्दल अमोल कुतवळ यांनी मंडळाच्या सर्व सभासदांच्या कौतुक केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी प्रभागातील जेष्ठ नागरिक,महिला व युवक आदींची उपस्थिती मोठी उपस्थिती होती.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments