Hot Posts

6/recent/ticker-posts

जागेच्या वादातून एकास कुऱ्हाडीने बेदम मारहाण

जागेच्या वादातून एकास कुऱ्हाडीने बेदम मारहाण


धाराशिव : राहत्या घराच्या जागेच्या वादातून एकास कुऱ्हाडीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे दि,१३ रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की  गणेश विठ्ठल कसबे, विठ्ठल श्रावण कसबे दोघे रा. चिंचपूर ढगे ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी राहते घराच्या जागेच्या वादाचे कारणावरुन  दि. 13.09.2023 रोजी 16.00 वा. सु. चिंचपुर ढगे येथे  फिर्यादी नामे- येडबा सुभाष कसबे, वय 35 वर्षे, रा. चिंचपुर ढगे, ता. भुम जि. उस्मानाबाद  यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन डावे पायाचे नडगीवर कुह्राड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी येडबा कसबे यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments