Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा : जकेकुर शिवारातील जुगारी अड्ड्यावर पोलिसांचा छापा,१६ जणाविरुद्ध गुन्हा नोंद, एकूण २,२८,३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त|Umarga: Police raided a gambling den in Jakekur Shivara, registered a case against 12 people, seized valuables worth Rs 2,28,355

उमरगा : जकेकुर शिवारातील जुगारी अड्ड्यावर पोलिसांचा छापा,१६ जणाविरुद्ध गुन्हा नोंद, एकूण २,२८,३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त|

धाराशिव : उमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारातील जुगारी अड्ड्यावर छापा मारून 12 जुगारी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये एकूण  2,28,355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक धाराशिव, यांचे आदेशाने व  मा. श्री नवनीत कॉवत अपर पोलीस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणेकामी दि.23.09.2023 रोजी सरकारी वाहनाने रवाना होवुन पोस्टे उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे आल्यावर गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम शिंदे यांचे घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी 22.45 वा. सु छापा मारला असता

      सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे 1) विक्रम भानुदास माने, 2) जितेंद्र ज्ञानोबा काळे, 3) अमोल विठ्ठल जाधव, 4)हितेन हरीलाल पटेल, 5)अजित जिलानी उस्ताद, 6)काका देविदास गायकवाड, 7)अमोल किसन माने, 8) बालाजी बाबुराव गायकवाड, 9) ऋषी किशोर जाधव, 10) तानाजी नागोराव गाडे, 11) राम किसन तोरंबे, 12) विलास रंगनाथ जाधव, 13)नागेश राम पवार, 14) राहुल धनु राठोड, 15) सचिन गायकवाड, 16)शरद मारेकर हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे  साहित्यासह 12 मोबाईल फोन, 3 मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण 2,28,355 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षीक श्री. नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. पारेकर, सपोनि श्री. भराटे, पोलीस नियंत्रण कक्षाचे सपोनि श्री. तिगोटे, पोलीस नियंत्रण कक्ष व उमरगा पोलीस ठाणेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments