धाराशिव : फटाके स्टॉल लावताय, परवानगी घेतली का? या तारखेच्या कालावधीत करता येणार अर्ज सादर
धाराशिव: दिवाळी सणाला जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाके स्टॉल लावले जातात. या स्टॉल साठी विक्रेत्यांना परवानगी घेणे बंधनकारक आहे, यावर्षी दिवाळीच्या निमित्त फटाके स्टॉल लावण्याची परवानगी 25 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत विक्रेत्यांना घेता येणार आहे. ज्या विक्रेत्यांना फटाके स्टॉल लावायचा आहे त्यांनी अर्ज सादर करावा तसेच प्रशासनाने आव्हान केले आहे.
परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज ,फॉर्म LE 5, संबंधित ग्रामपंचायत ,नगरपरिषद, नगरपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकाचे ना हरकत व जागेची कागदपत्र, संबंधित पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र, व विहित परवाना फीस भरणा केलेली चलन, विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत असे आव्हान अप्पर जिल्हा दंडाधिकारी महादेव किरवले यांनी केले आहे.
0 Comments