Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे नगरपरिषद कार्यालयामार्फत सफाई कर्मचारी न.प.शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी तसेच बचत गटाच्या महिलाची प्रभात फेरी , सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार

तुळजापुर येथे नगरपरिषद कार्यालयामार्फत सफाई कर्मचारी न.प.शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी तसेच बचत गटाच्या महिलाची प्रभात फेरी , सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार 

तुळजापुर : नगरपरिषद  कार्यालय येथे मा.जिल्हा सहआयुक्त आणि मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली "स्वच्छता पंधरवडा", "स्वच्छ्ता ही सेवा" व  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त तुळजापूर नगरपरिषद सफाई कर्मचारी, न.प.कर्मचारी, न.प.शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच बचत गटाच्या महिला यांची दि,२ रोजी तुळजापूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त मानवंदना देण्यात आली , तसेच न.प.कार्यालयाच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आल्या व सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.


यावेळी न.प.कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक,कनिष्ठ अभियंता अशोक सनगले,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुंके,आस्थापना प्रमुख श्रीमती प्रफुल्लता बरुरकर,शहर समन्वयक सुशांत गायकवाड,प्रकल्प अधिकारी श्रीमती शेख मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर


Post a Comment

0 Comments