शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापुर मंदिर संस्थानात माध्यम कक्ष कार्यान्वित,उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे यांची सदिच्छा भेट
धारशिव,दि १५: तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्ताने नवरात्र काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव यांचा माध्यम कक्ष मंदिर संस्थानात कार्यान्वित करण्यात आला आहे.आज या कक्षाला लातूर विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक(माहिती) डॉ.सुरेखा मुळे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक संचालक डॉ.श्याम टरके, माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी,मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, भिमा पडवळ, नंदू पवार, मोहन कोळी, रामकिसन तोकले, अनिल वाघमारे, शशिकांत पवार उपस्थित होते.
0 Comments