Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर कमानवेस भागातील पुजारी बांधवांचे शारदीय नवरात्र महोत्सवानिमीत्त वाहन पार्कींगबाबत निवेदन

तुळजापुर  कमानवेस भागातील पुजारी बांधवांचे शारदीय नवरात्र महोत्सवानिमीत्त वाहन पार्कींगबाबत निवेदन 

तुळजापुर: कमानवेस भागातील पुजारी बांधवांचे जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर,मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर,तहसिलदार मंदीर संस्थान यांना शारदीय नवरात्र महोत्सवा निमीत्त वाहन पार्कींग बाबत  निवेदन देण्यात आले. दि १५, रोजी नवरात्र महोत्सव प्रारंभ होत आहे भाविक भक्त नवरात्र महोत्सवा मध्ये कर्नाट,आंध्रप्रदेश,तामिळनाडु तसेच देशभरातीन लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात.

सदरील भाविकांसाठी जगदाळे पार्कींग,भाई उध्दवराव पाटील सभागृह येथे वाहने पार्कींगची व्यवस्था करावी बाबत निवेदन देण्यात आले.या निवेदनावरती सचिन रोचकरी मा.नगराध्यक्ष गणेश कदम मा.नगराध्यक्ष,मा.नगरसेवक नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,भाजपा शहराध्यक्ष राजेश्वर कदम,बबलु कदम,काकासाहेब चिवचिवे,किरण(टिनु) कदम, दिनेश क्षिरसागर,दिपक क्षिरसागर आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments