धाराशिव येथे ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या उषा बहेनजी यांना सामूहिक सभेत श्रध्दांजली
धाराशिव: येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयातील तांबरी विभाग सेंटरच्या प्रशिक्षक उषा बहेनजी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील आनंदनगर येथील ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालयाच्या केंद्रामध्येही सभा घेण्यात आली.
यावेळी सोलापूर विभागाच्या प्रमुख सोमप्रभा बहेनजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सुरेश जगदाळे, बार्शी सेवा केंद्राच्या संचालिका संगीता बहेनजी, पंढरपूर सेवा केंद्राच्या संचालिका उज्वला बहेनजी, मुरूम सेवा केंद्राचे संचालक राजू भाईजी, धाराशिव सेवा केंद्राच्या संचालिका ज्योति बहेनजी, सोलापूर सबझोन येथील भाई, बहेनजी, उषा बहेनजी यांचे नातेवाईक, ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments