Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

पुणे प्रतिनिधी : राष्ट्रीय आरोग्य अभियान चे कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचे शासन सेवेत समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन या मागणीसाठी २५  ऑक्टोबर पासून पुणे जिल्ह्यातील एन एच एम मधील सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले  आहेत दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी  आयुक्त कुटुंब कल्याण  धीरज कुमार यांनी कृती समिती सोबत बैठक घेतली व त्यामध्ये  राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजित करणे बाबत सविस्तर फेर प्रस्ताव इतर राज्यातील प्रस्ताव व निर्णयाचा अभ्यास करून शासनास तात्काळ सादर करणे बाबत निर्णय घेण्यात आला परंतु समायोजन कृती समिती मधील विविध संघटनाचे त्यावर समाधान न झाल्यामुळे काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 कंत्राटी कर्मचाऱ्यांची कामं बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून उतरले आहेत या आंदोलनाचा एक भाग म्हणून दिनांक ३० व ३१ ऑक्टोंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे दहा हजार कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते त्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समायोजन कृती समिती संघटनेत सोबत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली .

या बैठकीला आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक धीरज कुमार व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यात असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून आरोग्य विभागातील रिक्त जागापैकी ३०% जागा एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवून त्यांचे टप्प्या टप्प्याने समायोजन करण्यात येईल व येणाऱ्या कॅबिनेट पुढे हा विषय ठेवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले परंतु समायोजन कृती समितीतील संघटनेचे त्यावर समाधान न झाल्यामुळे काम बंद आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय सर्व संघटनेने घेतला बैठकीत दिलेले आश्वासन आरोग्य मंत्री यांनी आजाद मैदानाच्या आंदोलन स्थळी येऊन सर्व कर्मचाऱ्या पुढे सांगण्याचे आव्हान कृती समिती ने केले.

 त्यानुसार दिनांक ३१ रोजी आरोग्यमंत्री यांनी आंदोलन स्थळी घेतलेला निर्णय सर्व कर्मचारी समोर सांगितला परंतु कर्मचाऱ्यांनी संघटना समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन या मागणीवर ठाम राहिले व पुढे काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचे ठरले त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७५० डॉक्टर म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी ११५० नर्सेस औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी असे एकूण २७५० ग्रामीण भागातील आणि पुणे महानगरपालिकेतील व पिंपरी महानगरपालिकेतील १४०० कर्मचारी अधिकारी या काम बंद आंदोलनात उतरलेले आहे.

 तसेच दिनांक ६ नोव्हेंबर  रोजी पुणे जिल्हा परिषद च्या समोर सर्व कर्मचारी मिळून काम बंद आंदोलनात शासनाला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ घातले यामध्ये हजारो अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पुणे येथून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आक्रोश मोर्चा करणार असून त्यावेळी आम्ही डॉक्टर नर्सेस फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन इत्यादी सेवा देत असताना जे साहित्य वापरले जाते ते साहित्य रस्त्यावर मांडून आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments