धाराशिव शहरातील बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा, पाच जणांनी बंदुक व चाकूचा धाक दाखवत सोन्याच्या दागिन्यासह रोकड पळवली , हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
धाराशिव : शहरातील वरदळीच्या ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून सोन्याची दागिने व रोकड लुटून नेली आहे ही घटना शनिवारी दिनांक 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली असून शहरवासीयांत मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील दुसऱ्या मजल्यावर ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यालय आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोराणी या सोसायटीत प्रवेश केला . येथील शाखा व्यवस्थापकास व कर्मचाऱ्यास बंदूक व चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यास बांधून शाखा व्यवस्थापकासह दोघांना खोलीत डांबुन तोंडाला चिकटपट्टी लावली, सोसायटी कार्यालयातील रोख रक्कम सोन्याची दागिने घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले. या घटनेची माहिती समजतात शहर व आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत होते. या घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी ठसे तज्ञ, श्वान पथक ही पाचारण करण्यात आली होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस या घटनेची चौकशी करत होते.त्यामुळे रेणुका किती रुपयाचा मुद्देमाल गेला आहे हे मात्र समजू शकले नाही. या घटनेतील दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पुढील तपास धाराशिव पोलीस करीत आहेत बालाघाट न्यूज टाइम्स धाराशिव.
0 Comments