काढणीला आलेल्या तुरीची चोरी , तुळजापुर तालुक्यातील घटना; चौघांविरूध्द गुन्हा दाखल
धाराशीव, दि.२४ - मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या तीन एकर तुरीच्या पिकापैकी दीड एकर तुरीचे पीक काढून त्याची भावकीतीलच चौघाजणांनी चोरी केल्याची घटना जळकोट शिवारात घडली. याप्रकरणी जळकोट येथील चौघांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट येथील मनोज महावीर कदम या शेतकर्याने आपल्या मालकीच्या शेतजमीन गट नं0 763 मध्ये तीन एकर क्षेत्रावर यंदा तुरीचा पेरा केला होता. या तुरीच्या पिकापैकी जवळपास दीड एकर क्षेत्रातील काढणीला आलेल्या तुरीचे पीक 20 व 21 डिसेंबर रोजी भावकीतील नवनाथ व्यंकट कदम, महेश नवनाथ कदम, हरिदास नवनाथ कदम, संतोष नवनाथ कदम या चौघांनी संगणमत करून, संमतीशिवाय कापून नेवून मनोज कदम यांचे आर्थिक नुकसान केले आहे. जवळपास 60 हजार रूपये उत्पन्न असलेली ही तूर वरील चौघांनी काढून नेवून चोरी केली आहे. विशेष म्हणजे आरोपींविरूध्द तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाने मनाईचा आदेश पारीत केला होता. तरीही दांडगाईने वरील चौघांनी मनोज कदम यांच्या शेतात बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यांची दीड एकर क्षेत्रातील तुरीचे पीक कापून चोरी केले. याप्रकरणी मनोज कदम यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments