धाराशिव :दरोड्याच्या गुन्ह्यातील २२ वर्षापासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांच्या ताब्यात
धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेची एका पथकातील पोलीस नाईक1611 बबन जाधवर व पोलीस अमंलदार 662/ नागनाथ गुरव हे दि. 13.12.2023 रोजी मालाविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता सदर पथकास गोपनीय माहिती मिळाली की, आंबी पोलीस ठाणे येथे सन 2001 साली दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे- तुकाराम उर्फ तुक्या सुर्यभान काळे रा. पांढरेवाडी ह.मु. फक्राबाद ता. जामखेड, जि. अहमदनगर हा पुन्हा आंबी पोलीस ठाणे हद्दीत आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथकाने सापळा रचून नमुद आरोपीस ताब्यात घेवून आंबी पोलीस ठाणे येथे हजर केले. नमुद आरोपी हा गेल्या 22 वर्षा पासून वॉन्टेड आरोपी होता.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सपोनि श्री. शैलेश पवार, पोलीस हावलदार- प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, चालक पोलीस हावलदार- महेबुब अरब, QRT पथक, पोलीस नाईक- बबन जाधवर व पोलीस अमंलदार - नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.
0 Comments