Hot Posts

6/recent/ticker-posts

वृद्ध महिलेचा गळा आवळून खून , येरमाळा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल

वृद्ध महिलेचा गळा आवळून खून , येरमाळा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल

धाराशिव: एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळुन खून केला ही धक्कादायक घटना 20 ते 21 डिसेंबर दरम्यान उमरगा पाटील जवळील सोनारवाडी कडे जाणाऱ्या शिवरस्त्यालगत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी मिळालेली सविस्तर माहिती अशी की,येरमाळा येथील फिर्यादी पोपट व्यंकट पवार, वय 68 वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब, ह.मु. उमरगा ता. कळंब जि. धाराशिव यांच्या पत्नी मयत नामे-सिताबाई पोपट पवार, वय 68 वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब, ह.मु. उमरा ता. कळंब जि. धाराशिव  यांना दि. 20.12.2023 रोजी 18.00 ते दि. 21.12.2023 रोजी 06.00 वा. सु. उमरगा पाटीजवळ सोनारवाडी जाणाऱ्या शिवरस्त्या लगत अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरुन कशाने तरी गळा आवळून जिवे ठार मारले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पोपट पवार यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 .

Post a Comment

0 Comments