सोलापुर : जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने स्वतःवर झाडून घेतली गोळी
सोलापूर – सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपाई यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.ही शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकास गंगाराम कोळपे वय 34 रा. जेल पोलीस वसाहत सोलापूर(solapur) असे स्वतःवर गोळी झाडून घेतलेले कारागृह शिपायचे नाव आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेनगार्ड येथे ड्युटी वर असताना कारागृह शिपाई विकास कोळपे(vikas kolpe) यांनी स्वतःवर SLR रायफलने छातीवर गोळी मारून घेतल्याने त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकारी हरिभाऊ मिंड व इतरांनी भेटी देऊन माहिती घेतली. दरम्यान यातील पोलीस शिपाई(police constable) कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.
0 Comments