Hot Posts

6/recent/ticker-posts

काळेगाव येथे बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप

काळेगाव येथे बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ  प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप


तु़ळजापुर : सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू प्रकाश आप्पासाहेब साखरे यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव येथील पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व विध्यार्थ्यांना वाही व पेन चे वाटप करण्यात आले

     16 मार्च 2016 रोजी बुध्दवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे 2017 पासून प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून त्यांचे नातू वही पेन वाटपाचा उपक्रम राबवत आहेत. यावेळी काळेगाव चे उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजिनाथ उंबरे मुख्याध्यापक पोतदार सर माशाळे सर, नडगेरी सर, भोसले सर, पोपट उंबरे सर, प्रभाकर जाधव ज्ञानेश्वर साखरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments