धाराशिव : श्रीपतराव भोसलेमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिवमध्ये १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सकाळी मतदार प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. यावेळी कला व वाणिज्य विभाग प्रमुख श्री. एन. आर. नन्नवरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्री. डी. वाय. घोडके सर, प्रा. श्री. शिंदे सर, प्रा. खुने सर, प्रा. जाधव एस. आर. सर, प्रा. श्री. कोरके सर यांची उपस्थिती होती.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या मतदार जनजागृती फेरीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक व शेवटी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पोहोचली. यावेळी येथे जिल्हाधिकारी श्री. सचिन ओंबासे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीपर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. एस. व्ही. पाटील सर, सहकार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. जाधव एस. एल. मॅडम सहकार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. मोहिते के. बी. सर, श्री. काळे एम. पी. सर, प्रा. श्री. गोरे एस. एम. सर, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. श्री भोसले आर. एस. सर आदी प्राध्यापक विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर व प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments