Hot Posts

6/recent/ticker-posts

ढोकी व तडवळा येथे सर्व रेल्वे गाडयांना थांबा द्या - खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर,मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

ढोकी व तडवळा येथे सर्व रेल्वे गाडयांना थांबा द्या - खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर,मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी


धाराशिव : मध्य रेल्वे विभागाचे मुख्य प्रबंधक श्री. राम करण यादव हे जिल्हयातील विविध रेल्वे स्टेशनवर भेट देण्याकरीता आले असतात. जिल्हयातील धाराशिव तुळजापुर सोलापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे भुसंपादन अंतीम टप्यात असून लवकरच या मार्गाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. या पाश्वभुमीवर मुख्य प्रबंधक यांची भेट घेवून जिल्हयातील रेल्वे संबंधीच्या विविध प्रलंबीत मागण्याच्या अनुषंगाने खा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व धाराशिव कळंब चे आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील यांनी भेट घेवून निवेदन दिले.

जिल्हयातून मुंबईकडे जाणाऱ्या लातूर मुंबई एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस या रेल्वे गाडयांसह अन्यसर्व सुपर फास्ट व एक्सप्रेस रेल्वे गाडयांना अनुक्रमे कळंब रोड स्टेशन (तडवळा स्टेशन) व नांदेड पनवेल एक्सप्रेस या रेल्वे गाडीला ढोकी स्टेशन तसेच परळी मिरज पॅसेंजर रेल्वे गाडीला मुरुड रेल्वे स्टेशन वर थांबा देणे बाबत विनंती करण्यात आली आहे.

धाराशिव- तुळजापुर- सोलापूर या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे भुसंपादन शासनामार्फत सक्तीच्या भुसंपादन कायद्याप्रमाणे करण्यात येत असून सदर भुसंपादन प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीचा मावेजा बाजार मुल्याच्या म्हणजेच रेडीरेकनर दरानुसार मिळणार असून तो चार पट इतका आहे. परंतू जिल्हयातील शेतकऱ्यांचे इतर जिल्हयातील रेल्वे मार्गाकरीता पुणे मिरज ब्रॉडगेज, बारामती फलटन लोनंद रेल्वे मार्ग, वडासा गडचिरोली रेल्वे मार्ग प्रमाणे म्हणजेच थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे मावेजा देण्यात यावा. सदर मार्गाचे पुर्नमुल्याकन करुन संपादित जमीनीचा मावेजा देण्याबाबत रेल्वे विभागाने कार्यवाही करणेबाबत निवेदन देण्यात आले.

जिल्हयातून जाणाऱ्या एकमेव रेल्वे मार्गावरती विविध गाडया धावत असून या मार्गावरती लांब पल्याच्या गाडयाची संख्या कमी आहे. कोल्हापुर धनबाद या रेल्वे गाडीचा अपवाद सोडता या मार्गावरती अन्याय लांब पल्याची कोणतीही गाडी धावत नसून कोल्हापुर अमरावती तसेच सोलापूर विभागांतर्गत तिरुपतीकडे जाणाऱ्या गाडयांचा मार्ग या मार्गाकडे वळविणे बाबत व अन्य नविन रेल्वे गाडया सुरु करणे बाबत तसेच साप्ताहिक गाडयांची संख्या व विशेष गाडयांची संख्या वाढविणे बाबत, रेल्वे प्रवाश्यांच्या समस्याच्या संदर्भाने मुख्य प्रबंधक यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.  तसेच रेल्वे स्टेशन ते उपळा उड्डान पुलापर्यंत (राष्ट्रीय महामार्ग क्र. 211) रस्ता रुंदीकरण करणे बाबत निवेदन देण्यात आले आहे.

या समयी रेल्वे विभागाचे मुख्य प्रबंधक श्री. राम करण यादव, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, संग्राम देशमुख, चंदु जमाले, तुळशीदास जमाले, सोमनाथ आप्पा गुरव, रवी कोरे, पांडुरंग माने, बाळासाहेब काकडे, निहाल काझी आदीसह  उपस्थीत होते.




Post a Comment

0 Comments