धाराशिव :आदिती ताई तटकरे यांना तरुण विधवा परितक्त्या महिलांना अर्थसहाय अनुदान मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने दिले निवेदन
धाराशिव : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा आदित्य तटकरे काल धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे भेट दिली. आदिती ताई तटकरे यांच्या सोबत मराठवाडा युवती प्रदेशाध्यक्ष अंकिता ताई विधाते, जि.प.धाराशिव च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यावेळी उपस्थित होत्या.राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत आदिती ताई तटकरे यांनी चर्चा केली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांनी जिल्ह्यातील तरुण विधवा परितक्त्या महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यासाठी आदीतीताई तटकरे यांना याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच तरुण विधवा परितक्त्या महिला असून त्यांना आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या पायावर उभे राहू शकत नसल्याने कुटुंबीयांची, मुलाबाळांच्या शिक्षणाची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही यासाठी महिला व बालकल्याण मंत्री यांनी आपल्या स्तरावर अनुदान तात्काळ देऊन सहकार्य करावे असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी जिल्ह्यातील तरुण विधवा परितक्त्या महिला उपस्थित होत्या त्यांनी आपले गाऱ्हाणे महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या समोर मांडले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत शहराध्यक्ष सचिन तावडे, पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,
धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, महेश नलावडे, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, विवेक साळवे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षिरसागर, आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर, समीयोदिन मशायक, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, धाराशिव तालुका उपाध्यक्ष विराट पाटील,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगा जि.प..गटप्रमुख सुरेश राठोड, विनोद अवतारे,
धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, महेश नलावडे, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, विवेक साळवे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षिरसागर, आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर, समीयोदिन मशायक, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, धाराशिव तालुका उपाध्यक्ष विराट पाटील,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगा जि.प..गटप्रमुख सुरेश राठोड, विनोद अवतारे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.
0 Comments