मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे करा उपाय|Take these steps to keep your mental health fit
नमस्कार आपण पाहत आहात बालाघाट न्यूज टाइम्स आजच्या लेखामध्ये आपण मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय उपाय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.
आजच्या धगधगीच्या जीवनात तणाव निर्माण होणे साधारण गोष्ट झाली आहे त्यामुळे स्वतःला मानसिक रित्या तंदुरुस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. जर आपली मानसिक आरोग्य चांगले असेल तर आपल्या जीवनाचे अडचणींना आपण सहज हाताळू शकतो त्याचबरोबर आपल्या प्रगतीसाठी चांगल्या मानसिक आरोग्याची आवश्यकता असते त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप उपाय आहेत त्यातील आपण काही उपाय पाहणार आहोत
नवीन काही शिकत रहा : मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काम आवडते ते वेळ काढून केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला मजा येईल आणि खूप शिकण्यास मदत होईल.
आरोग्यावर लक्ष ठेवा : असे म्हणतात की चांगली आरोग्य असल्यास मेंदूही चांगला राहतो, चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल त्यासाठी तुम्हाला पोषक आहाराचे सेवन करावे लागेल आणि खूप पाणी प्यायला पाहिजे त्याशिवाय नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या धूम्रपान करू नका.
सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवावा : अशा लोकांसोबत राहा जे सकारात्मक विचार करतात जे सामाजिक दृष्ट्या सक्रिय आहेत ते लोक निरोगी असतात त्यामुळे प्रसन्न राहण्यास मदत होते. लोकांसोबत चांगली वागणूक ठेवा त्यांच्यासोबत चांगला विचारही करा.
दुसऱ्यांना मदत करा : प्रत्येक व्यक्तीने जेव्हा दुसऱ्यांना गरज असेल तेव्हा मदत केली पाहिजे दुसऱ्याला मदत केली मी तुम्हाला खूप आनंद होईल आनंद राहिल्याने मनाला व मेंदूला शांती मिळते.
ताण तणाव दूर ठेवा : आजच्या काळात प्रत्येकाला ताण तणाव असतो त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आजार होतात त्यामुळे आपल्याला तणावापासून लांब राहिले पाहिजे कामाला लांब ठेवायची असेल तर व्यवस्थापन असायला पाहिजे म्हणून नियमित व्यायाम केला पाहिजे जशी की खेळणी फिरणे पहाटे व्यायाम करणे.
शांत रहा : जीवनात शांत राहण्यासाठी चिंतन आणि योग करा त्यामुळे तुम्हाला मानसिक रित्या शक्ती मिळेल आणि एकाग्रता वाढेल शांत राहिल्याने मानसिक आरोग्य चांगले राहील त्यामुळे तुम्हाला आयुष्यात जास्त त्रास होणार नाही.
नेमकं काय करायचे ते ठरवा : तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे त्यासाठी गोल सेट करा त्या तुमचे लक्ष काय आहे त्या पर्यंत पोचण्यासाठी काय करू शकता ते लक्षात ठेवा. त्यासाठी व्यवहारिक मार्गाचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला जे करायचे आहे त्यापर्यंत तुम्ही आरामात पोहोचणार त्यामुळे तुम्ही मानसिक रित्या तंदुरुस्त राहाल.
गरज असल्यास मदत घ्या : आयुष्यात खूप वेळा अडचणी येतात त्यासाठी आपल्याला कधी कधी दुसऱ्याची गरज भासते त्यामुळे मदत मागितली पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपली अडचण कमी होते आणि मानसिक होते आपण निरोगी राहतो.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या बालाघाट न्युज टाइम्स याची पुष्टी करत नाही.)
0 Comments