शेत रस्त्याच्या वादावरून पुतण्याने चुलतीस ट्रॅक्टर खाली चिरडून केले ठार
धाराशिव: शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून भावगीतील वादामध्ये पुतण्याने चुलतीस ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना गुरुवारी दिनांक 8 रोजी कळम तालुक्यातील शिरढोण येथे घडली. घटनेनंतर फरार झालेल्या पुतण्यास शिराढोण पोलीसांनी बेड्या ठोकून गजाआड केले असून न्यायालयासमोर हजर केले आहे ., त्याला दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील परमेश्वर गोविंद यादव व बाळासाहेब विठ्ठल यादव या दोन चुलत भावामध्ये शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून वाद सुरू आहे, याच कारणावरून दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये हत्यारांचाही वापर करण्यात आला होता. दरम्यान दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिलाबाई परमेश्वर यादव वय (४०) या आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या चुलत पत्नी समाधान बाळासाहेब यादव वय (२५) याने सदरील महिलेस लाल रंगाचा ट्रॅक्टर हेड गोल फिरवून तसेच अंगावर घालून चिरडले होते. ही घटना पेट्रोल पंपा समोरील तोष्णीवाल यांच्या पडीक शेतामध्ये घडली होती. यावेळी सदरील जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सदरील आरोपीने तिला दोन ते तीन वेळा ट्रॅक्टर खाली घालून चिरडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
त्यानंतर आरोपी समाधान यादव हा घटनास्थळावरून फरार झाला होता, याप्रकरणी परमेश्वर यादव यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत आरोपीला तात्काळ अटक करून दिनांक 9 रोजी न्यायालय समोर हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपीस 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार दयानंद गादेकर हे करत आहेत.
0 Comments