धाराशिव जिल्ह्यात काढणीला आलेल्या सोयाबीनवर पावसाचे गडद संकट, शेतकरी दुहेरी संकटात
धाराशिव/राजगुरु साखरे : जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच कुठे मुबलक तर कुठे अत्यल्प पाऊस यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम आहे,. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात मागील महिन्यामध्ये झालेले अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले तर राहिले सुरल्या भागातील शेतकऱ्यांनाही आता परतीच्या पावसाचा फटका बसत आहे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन पिकावर दुहेरी संकट उभे टाकले आहे . जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर शेतकऱ्यानी कशीबशी पेरणी केली, यानंतर अधून मधून पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपातील पिके जगवली, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या औषधाची पिकावर फवारणी करून पिके जोमात आणली. माञ सोयाबीन, उडीद पिक कापणीला आले असताना शनिवारी परिसरात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे..
त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. मात्र परतीच्या पावसाने शनिवारपासून परिसरात सुरुवात केल्याने सोयाबीन कानी केलेल्या शेतकऱ्यांना राशी थांबली आहेत तर सोयाबीन पिक उभी असलेल्या शेतकऱ्यांना असाच पाऊस जास्त झाला तर सोयाबीन शेंगांना कोंब तर फुटणार नाही ? याची भीती शेतकरी वर्ग करत आहे.या पावसामुळे संकटाची मालिका सुरु असलेल्या शेतकर्यांची धावपळ होत आहे.
परतीचा मान्सून, काढणीला आलेले सोयाबीन, वाढलेले मजुरांचे दर, तेही मिळवण्यासाठी चालू असलेली तारेवरची रोजची कसरत, मळणी मशीन, हार्वेस्टिंग मशीन, मिळविण्यासाठी चालू असलेली शेतकरी वर्गाची दमछाक, हे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोयाबीनला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना केलेला खर्चही निघतो की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.एकाच वेळी काढणीला आलेले सोयाबीन, मजूर टंचाई, पावसाची टांगती तलवार, यामुळे एकरी चार ते पाच हजार रुपये सोयाबीन काढणीसाठी इतका दर वाढला आहे. त्याच पटीत सोयाबीनचे बाजार भाव असल्याने शेती कशी कसायची? हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
0 Comments