धाराशिव: सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हा बंदची हाक
धाराशिव: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे मात्र अद्याप सरकारने दखल घेतलेली नाही त्यांची प्रकृती दिवसागणित चिंताजनक बनत चालल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांना उपोषणाला बसले आहेत चौथ्या दिवशीही सरकारकडून या उपोषणाची दखल घेतली गेली नाही. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे त्यामुळे आता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे .सरकारने जरांगे पाटील यांची मागणी तातडीने मान्य करावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे जिल्हाभरातील व्यापारी शाळा तसेच महाविद्यालयाने ही सहकार्य करावे अशी आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments