चारित्र्यसंपन्न राज्याचे वारसदार आम्ही स्त्रीचा आदर करणारे मावळे आम्ही :- ह. भ. प .शिवलीलाताई पाटील
नाईचाकुर प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील श्री राष्ट्रमाता जिजाऊ चौक गणेश मंडळ नाईचाकूर च्यावतीनेश्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या मैदानावर समाज प्रबोधनकार युवा कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन सेवा आयोजित केले होते या कीर्तन सेवेला प्रारंभ करताना जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग सेवेसाठी निवडले
हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
हेचि माझी सर्व जोडी
नलगे मुक्ती आणि संपदा
सत्संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी
या चार चरणाच्या अभंगावर अनुसरून शिवलिलाताई पाटील यांनी किर्तन केले तुकोबा ज्ञानोबाला जपणारा पोरग मध्यरात्री अर्ध नग्न अवस्थेत असलेल्या मुलीला त्याच्या आई-बाबाकड सुरक्षित सोडणारा असं आमचं वारकरी संप्रदाय आहे शिवलीला पाटील यांनी कीर्तन सेवेच्या रूपातून समाज प्रबोधन केले
मुस्लिम राजाची मुलगी अचानक गायब झाली होती बेगम आपल्या राजाला म्हणू लागली आपल्या मुलीला शिवाजी महाराजांच्या सैन्याने पळून तर नेल नसेल मुस्लिम राजा आपल्या पत्नीला मोठ्या आवाजाने बोलला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील महिलावर अत्याचार केलं त्याचा बदला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलीवर अत्याचार करणार नाही शिवाजी हा आपली गड किल्ले जिंकण्याचा प्रयत्न करेल पण आपल्या माता बहिणीवर त्याची वाईट नजर टाकणार नाही असे आपल्या बेगमला म्हंटले शिवलीला ताई पाटील यांनी
कीर्तनात म्हटले त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मंडळाचे कौतुक केले आजच्या जमान्यात डॉल्बीच्या तालावर नाचणारी मंडळी पण नाई चाकूर येथील राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मंडळाच्या युवकांनी आपली महाराष्ट्रातील संस्कृती टिकली पाहिजे व आपल्या गणेश मंडळातर्फे भाविक भक्तांना सांप्रदायाची आवड झाली पाहिजे व समाज सुधारला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी कीर्तनाच्या रूपातून मुला मुलींना समज दिली मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नका आयुष्य सुंदर आहे जगण्याचा आनंद घ्या व्यसनाच्या आहारी जाऊन शरीराचा खुळखुळा करू नका असे समाज प्रबोधन केले मुलींनो पळून जाऊन लग्न करू नका तुमच्या आई-बाबाची समाजात खाली मान घालण्याची वेळ तुमच्यामुळे आणू नका आई-बाबा का असतात ते तुम्ही आई झाल्यानंतरच कळेल मुलींनो चांगले शिक्षण घ्या चांगली नोकरी करा तुम्हाला मुलगा चांगला भेटेल भेटेल वाकड तिकडे पाऊल टाकू नका पळून जाऊन प्रेम विवाह करून लग्न करणारा संसार सुखाचा होत नाही आणि त्यांचा संसार शेवट जात नाही आजपर्यंतच्या इतिहास आहे ज्ञानोबारायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आज सातशे वर्षांपूर्वी लिहिलेले ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्या जीवनात बदल नक्की होईल पांडुरंगाची भक्ती भवानी सेवा करा तुम्हाला सरळ हाताने देव दिलेला दिसणार नाही पण काही कमी पडणार नाही देव तुम्हाला सुखी ठेवेल असे आपल्या कीर्तनातून शिवलिलाताई पाटील यांनी भाविक भक्तांना कीर्तन रुपी संदेश दिला
राष्ट्रमाता जिजाऊ चौक गणेश मंडळातर्फे कीर्तनाला आलेल्या भावीक भक्तांना चहा पाण्याची व्यवस्था केली होती नाईचाकूर येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कीर्तनाचे आयोजन केले होते क्रीडांगण भाविकांनी भरून भक्तगण बाहेर रोडवर बसून किर्तनाचा आनंद घेत होते चोपदार म्हणून जयराम पाटील, विणेकरी बलभीम महाराज पवार राष्ट्रमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळाचे सदस्य अध्यक्ष अनुराग पवार ,उपाध्यक्ष वैभव पवार आदर्श पवार, विश्वजीत पवार, ,दत्ता पवार,, आकाश पवार ,उमेश पवार प्रसाद पवार, बालाजी पवार, अमित पवार ऋत्विक पवार, पवार ,सुरज पवार ,हर्ष पवार,आशिष पवार शुभम पवार , शिशिर पवार ,ओम पवार त्यांनी किर्तन पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
0 Comments