कृषी न्यूज : आज पासून पुढील पाच दिवस पाऊस, प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज
धाराशिव : हवामान विभागाने 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी दाखवले असून सोयाबीन सह आणि खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आला आहे. आता तोंडाशी आलेला सोयाबीनचा घास पाण्यास गेल्यास कुटुंबाची आर्थिक गणित बिघडणार आहे यामुळे काढलेले सोयाबीन झाकून ठेवण्याची काम शेतकरी करत आहेत. यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये पाणीसाठा झाला नाही.
सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे पाच ते सात दिवस सोडले तर उर्वरित जवळपास पंधरा दिवस पावसाने उघडीत दिली यामुळे वातावरणात गर्मी निर्माण झाली असून उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे. मात्र काही दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे याबाबत मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशता ढगाळ राहून मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या पावसात काढणीला आलेले सोयाबीन भेटल्यास किंवा काढलेले सोयाबीन भिजल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. काही शेतकरी हवामाना विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे सोयाबीन काढणी थांबवली आहेत तर काही शेतकऱ्यांनी काढणीस सुरुवात ही केली आहे. विश्रांतीनंतर येणाऱ्या पावसासह वादळी वाऱ्यांचा समावेश आहे यामुळे नुकसानीची शक्यता अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो पावसाने उघडीप दिल्यानंतरच काढणी करणे गरजेचे आहे.
0 Comments