Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी पुत्र अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे भरणार मंगळवारी उमेदवारी अर्ज


⛔तुळजापूर   : तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी आपली उमेदवारी कायम राहणार असल्याचे सांगत अपक्ष उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दि,२९ मंगळवार रोजी दाखल करण्यात येणार आहे असे सांगितले आहे. तुळजापूर  विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जात आहे या मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार राणाजगजितसिंह  पाटील हे आहेत तर महाविकास आघाडी कडून अद्याप पर्यंत उमेदवारी निश्चित झाली नाही. यामध्ये शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे  हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. तुमच्या सर्वांचे आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, मतदारसंघातील मायबाप जनतेने मला विधानसभेत जाण्याची संधी द्यावी असे आवाहन शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी केले आहे.

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोरगरिबांच्या प्रश्नावर अडचणी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्या पोरा बाळांच्या चांगल्या शिक्षणासाठी व उज्वल भवितव्यासाठी उभारलेल्या लढ्याची पहिली पायरी चढण्यासाठी तुम्हा सर्वांची आशीर्वादाची नितांत गरज आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वादाने दिनांक 29 मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतोय पाठिंबा द्यायला नक्की या.


______________________________________


 



Post a Comment

0 Comments