सोलापूर: माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथे पाच वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून आरोपींनी कुऱ्हाडीने चंद्रकांत हांडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात घाव घातला त्यात गंभीर जखमी झाल्याने हांडे यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी हनुमंत कोळेकर यास न्यायमूर्ती एल.एस.चव्हाण यांनी जन्मठेप व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
ही घटना 5 ऑक्टोबर 2019 रोजी घडली होती, या घटनेची थोडक्यात हकीगत अशी की माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथील शेतकरी चंद्रकांत हांडे हे ५ आक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास ज्वारी पेरण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. यावेळी बायडाबाई कोळेकर ही शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरवर दगड मारून शिवीगाळ करू लागली व ते तिथेच उभा असलेला हनुमंत दगडू कोळेकर हा चंद्रकांत हांडे यांना जमीन कशी घेतो ते पाहतो, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा तिथेच उभे असलेले हनुमंत कोळेकर याचे नातेवाईक दत्तात्रय हांडे, अजिनाथ हांडे व हरिदास हांडे यांनी त्याला आज सोडू नको. काही घडल्यास आम्ही पाहतो, असे कोळेकर याला म्हटले. त्यानंतर कोळेकर याने कुऱ्हाडीने चंद्रकांत हांडे यांचा खून केला. याबाबतचा मयताचा मुलगा सूर्यकांत हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमान कोळेकर बायडाबाई कोळेकर दत्तात्रय हांडे आजिनाथ हांडे हरिदास हांडे सर्व राहणार फुटजवळगाव तालुका माढा यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास डीवायएसपी विशाल हिरे यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली न्यायालयात व सर्व पत्र दाखल केले सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्ह्यात 14 साक्षीदार तपासण्यात आले.
यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष डॉक्टर इनामदार यांची साक्षर तसेच तपाशी अंमलदार डीवायएसपी विशाल हिरे यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकील राजश्री कदम यांनी न्यायालयासमोर मांडले असता सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता न्यायालयाने आरोपी हनुमंत कोळेकर राहणार फुटजवळगाव तालुका माढा यास भारतीय दंड विधान संहिता कलम 302 अन्वे दोषी ठरवून शिक्षा ठोकली तर उर्वरित चार आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट जयदीप माने व एडवोकेट शरद झालटे यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
0 Comments