Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हातील महाविकास आघाडी उमेदवारांना आदेशानुसार संपूर्ण पाठिंबा - भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 'आप ' ला महाविकास आघाडीने काही जागा सोडाव्यात - " आप "चे मधुकर शेळके यांची मागणी "


तुळजापूर प्रतिनिधी दि,२६ -आम आदमी पार्टीचे धाराशिव  जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके यांनी  जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडुकीत आम आदमी पार्टी ने महाविकास आघाडी उमेदवारांना पाठींबा द्यावा हे राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणीच्या आदेशाचे स्वागत केले असून यापुर्वीही संपूर्ण राज्यभरात आप ने लोकसभा निवडनुकीतही इंडिया घटबंधन उमेदवारांना निवडुण आणण्याकरिता मोठा हातभार लावला आहे .

 त्याचप्रमाणे नोव्हेंबर मध्ये होउ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुर्ण ताकतीनी महाविकास आघाडी उमेदवारांना पक्षाच्या आदेशानुसार निवडून आणण्यासाठी बळ लावणार आहे पण सर्वसामान्य जिल्ह्यातील  आम आदमी कार्यकत्याची व माझी  भुमिका अशी आहे कि आगामी होउ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवड्नुकीच्या अनुषंगाने जिल्हापरिषद  पंचायतसमिती तसेच नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीला प्राबळ्य असलेल्या जिल्ह्यातील सर्वच  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या  उमेदवारांना काही जागा सोडाव्यात  व संपूर्ण ताकत लाऊन सदरील आप उमेदरवारांना निवडून आणण्यास प्रयत्न करावे अशी मागणी आप जिल्हाउपाध्यक्ष तथा सामाजिक  कार्यकर्ते श्री .मधुकर(भैय्या ) शेळके यांनी महाविकास आघाडीच्या जिल्हयातील वरिष्ट नेत्याकडे केली आहे. यावेळी आप जिल्हा उपाध्यक्ष श्री .मधुकर शेळके  व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments