Hot Posts

6/recent/ticker-posts

ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत

 

ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत

धाराशिव :  शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Post a Comment

0 Comments