Buldhana:पत्नी सोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानेच पोलीसाची हत्या,, चौघांना अटक प्रियकर बाबासाहेब म्हस्केने दिली सुपारी

Hot Posts

6/recent/ticker-posts

Buldhana:पत्नी सोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानेच पोलीसाची हत्या,, चौघांना अटक प्रियकर बाबासाहेब म्हस्केने दिली सुपारी

Buldhana:पत्नी सोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानेच पोलीसाची हत्या,, चौघांना अटक प्रियकर बाबासाहेब म्हस्केने दिली सुपारी


बुलढाणा: जालना महामार्ग पोलीस दलात पोलीस शिपाई असलेल्या ज्ञानेश्वर मस्के यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी अवघ्या चार तासातच छडा लावून मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के यांच्या सह यांना जिल्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केली आहे बाबासाहेब यांचे पोलिसाच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते पती अडसर ठरत असल्याने सहा लाखाची सुपारी देऊन त्याला संपवण्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बाबासाहेब शामराव मस्के वय (38) राहणार गिरोली खुर्द कमलाकर पंडितराव वाघ वय 44 दिलीप बाजीराव वाघ वैभव संपत शिंदे वय 38 सर्व राहणार बाजी उमरत तालुका जिल्हा जालना अशी अटक केलेली आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींची देऊळगाव राजा येथील जेएमएफसी न्यायालयाने 5 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे.

 देऊळगाव राज्यातील सिंदखेड राजा मार्गावर आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वन विभागाच्या जागेत शिफ्ट डिजायर कार क्रमांक mh2063 मध्ये पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के यांचा मृत्यू 30 मार्चला आढळून आला होता; पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्याची चमू तसेच देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी वेगवान तपास केला या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के याला दुपारी ताब्यात घेतली ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी,उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम ,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संतोष महल्लेस ,आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, एपीआय  संजय मातोंडकर पीएसआय दत्ता नरवाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे पोलीस शिपाई राजू अंभोरे दीपक वायाळ विजेता पवार ऋषिकेश थोटे हर्षल जाधव विजय सोनवणे राहुल बोर्डे राजू आढाव ऋषिकेश खंडेराव देऊळगाव राजा पोलीस ठाण्याची एप्रिया हेमंत शिंदे पीएसआय भारत शिर्डे व मल शिंदे जळवाल भगवान नागरे मोगल समाधान गीते समाधान बंगाली राहुल मुळे अभिजीत ठाकरे अनिल देशमुख गजानन ठाकरे यांनी आरोपींना अटक केली आहे .

आरोपी बाबासाहेब गाव पुढारी

मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के हाय गिरोली खुर्द येथील राजकारणात सक्रिय होता त्याची पत्नी माजी  सरपंच व विद्यमान सदस्य आहे गाव पुढारी म्हणून तो मिरवत होता.

मित्राचेच घडवली हत्याकांड

ज्ञानेश्वर मस्के मूळचे गिरोली खुर्ची रहिवासी होते नोकरी निमित्त ते पत्नी व दोन अपत्या सह जालना येथे अंबड चौफुली भागात राहत होते आरोपी बाबासाहेब म्हस्के व ज्ञानेश्वर मस्के हे नातलग असून त्यांच्या घट्ट मैत्री होती त्याचाच फायदा आरोपींनी घेतला आणि पत्नीशी सुत जुळवले अनैतिक संबंध आड येत असल्याने काटा काढण्यासाठी जालन्यातील टायगर नावाच्या एका गुंडाला सहा लाखाची सुपारी दिली 29 मार्चला पोलिसांचे आयुष्याचा खेळ खल्लास करण्यात आला

सुपारी किलर अटकेत

सुपारी किलर टायगर नेत्याची दोन गुंड बाबासाहेब मस्के कडे पाठवले 29 मार्चच्या रात्री देऊळगाव राजा मार्गावरील एका हॉटेलमध्ये बाबासाहेब मस्के यांनी मृत ज्ञानेश्वर मस्के यांना दारू पाजली त्याची बिल बाबासाहेब यांनीच भरले तेथील सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांना मिळाले चौघांनी मिळून ज्ञानेश्वर मस्के यांचा गळा वळून निर्गुण खून केला  गाडीत ठेवला पोलिसांनी योग्य चार तासाचा गुन्ह्याचा छडा लावून सुपारी किलर सहप्रेकराला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments