Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडच्या वाळू गॅंगला अजितदादांचा आवाज! टायर मध्ये घालेन मकोका लावेन....!-Beed valu gang Ajit pawar

बीडच्या वाळू गॅंगला अजितदादांचा आवाज! टायर मध्ये घालेन मकोका  लावेन....!-Beed valu gang Ajit pawar


बीड: मागील काही महिन्यात बीडची प्रचंड बदनामी झाली इथे सगळ्या प्रकारच्या गॅंग आहेत पण इथे पालकमंत्री देखील मी आहे येणाऱ्या काळात वाळू राखेतील गॅंगला सुता सारखे सरळ करतो असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

बुधवारी बळीराम गवते यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस युवा समाज मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले बीड ही देव देवतांची भूमी आहे जनतेची सेवा करण्यासाठी बल देण्याचे देव-देवतांना साकडे घातले आहे मागील काही महिन्यात बीड करांची बदनामी सुरू आहे बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायचे आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही तरुणाची आहे बळीराम गवते आणि त्यांच्या टीमने पुढे येऊन दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी काम करावे दरम्यान कार्यकर्ते त्यांनी आपल्या सोबत कार्यकर्ते स्वच्छ प्रतिमेची ठेवावेत कार्यकर्ते तपासून घेतले नाहीत तर त्यांचे परिणाम नेत्यांना भोगावे लागतात. बीडचे विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत येणाऱ्या काळात जास्तीचा निधी येथे कसा देता येईल ते मी पाहतो शेतीत आता aI तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. बीडमध्ये तारांगण केले जाणार आहे विमानतळ जिल्ह्याच्या जवळ असले पाहिजे उगीच ते इकडे करा तिकडे करा असे म्हणू नका टप्प्याटप्प्याने राज्यातील विमानतळावर नाईट लँडिंग सुरू केले जाणार आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथील सुविधा वाढण्यात येणार आहेत पुढे जायचे असेल तर बेरजेचे राजकारण करत करत सर्व समभाव राजकारण केले पाहिजे; आपल्या बाजूला चुकीच्या प्रवृत्तीची लोक नकोत असेही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवले पक्षाचा विचार लोकापर्यंत पोहोचवा सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नका दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. दादागिरी  लांबपर्यंत पोहोचत असतील त्यावर पण कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित आमदार प्रशांत सोळंके युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आमदार विजयसिंह पंडित आमदार विक्रम काळे कल्याण आखाडे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी आमदार बाळासाहेब आजबे ,संध्या सोनवणे ,बबन गवते यांची उपस्थिती होती.


अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे दरम्यान तब्येत ठीक नसल्याने बुधवारी दौऱ्याला उपस्थित राहू शकलो नाही असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते बुधवारच्या या दौऱ्या दरम्यान त्यांनी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाच्या बैठका घेतल्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास कामावर चर्चा झाली विशेष म्हणजे बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे हे या बैठकीला उपस्थित नव्हते धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे हा दौरा चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment

0 Comments